Wednesday, August 19, 2009

व.पु. ...

खरंतर एखाद्या पुस्ताकविषयीच लिहायचं होतं पण नाही जमलं
पण मग अपर्णाचा post पाहिला आणि वाटलं आपणपण व.पु.न्च्या ओळी तरी post कराव्यात :)
बघा पटतंय का...

"ओझं दिसतं कारण ते लादलेलं असतं. जबाबदारी स्वीकारलेली असते.
ओझं बाळगणारयाला कदाचित मदतीचा हात मिळतो. तसं जबाबदारीचं नसतं."


"मैत्रितली एक विलक्षण ताकद जर कोणती असेल तर, त्यातली सहजता. त्या सहजतेमधून सुरक्षितपणाची साय आपोआप धरते. साय दूधातुनच तयार होते आणि दुधावरच छत धरते. साय म्हणजे गुलामी नव्ह. सायीखालच्या दूधाला सायीचं दडपण वाटत नाही. मैत्रीचा प्रत्येक टप्पा हा व्यक्तीमत्वाचा नवा उत्कर्ष बिंदू ठरावा. आपल्याला लहानपणचे आठवते त्या आधीपासून आपण मैत्रित पडलेले असतो"

"नियतीचं माणसाला काही सुखांना पारखं करते,तेव्हा तिथे इलाजच नसतो.पण, त्याहीपेक्षा, माणुस जेव्हा दुसर्‍या माणसाचं आयुष्य वैराण करतो त्याचं शल्य जास्त."

"जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपुर माहीत असला तरी जगावेगळी समस्या उभी राहीली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही."


"काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल."

"स्वतःच्या यातनामय आयुष्यक्रमाची आणि भावनात्मक ताणतणावाची तितक्याच लहरींवर दुसा-या कुणाला तरी जाणीव आहे आणि ती व्यक्ती ही तेवढीच बेचैन आहे, एवढ्याच आधाराची संवेदनक्षम व्यक्तीला गरज असते."

"आपण हा जो जन्म घेतला आहे तो अपेक्षपूर्तिंसाठी नाही.
आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात असे नाही, आपल्या स्वतः कडुनहि अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणारया व्यथा.
माझ्या मते हा जन्म अपेक्षपुर्तिंसाठी नाहीच, तो आहे परतफेडिसाठी...!!!"


"उथळ विचारांची माणसं देवावर आणि दैवावर विश्वास ठेवतात,
शहानी आणि समर्थ माणसं कार्यकारणभावावर विश्वास ठेवतात..
अस्थिर माणसं जशी बारमधे सापडतात तशी सिधदिविनायकाच्या रांगेतही..
अर्थहीन श्रध्दा ही व्यसनासारखीच... "

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्याचा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच बरयाच वर्षात खाल्ली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्याच्या बिया घासुन चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परीस्थितीचे चटके सोसतानाच पुरेवाट झालेली असते. कॅलिडोस्कोप बघितलेला नाही. सर्कशितला जोकर आता आपलं मन रिझवु शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही आता राहीलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बाळपणीचा काळ सुखाचा " स्वत: बरोबर कधी नेला ते कळलंच नाही. त्या ऊडणारया म्हातारीने सर्व आनंद नेले. त्याच्या बदल्यात तिच वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणुन ती अजुनही ऊडु शकते. आपण जमिनीवरच आहोत"

"पावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो , तेंव्हा काही वाटत नाही. तो अंगावरच हळू हळू सुकतो त्याचंही काही वाटत नाही.सुकला नाही तरी ओल्याची सवय होते.पण म्हणून कोणी ओलाच शर्ट घाल म्हटले तर....."

"प्रेम म्हणजे ताजमहाल आहे.डोळे निवतील,
मनाला बरं वाटेल,ईतपतच खरं आहे.बांधण्याचा प्रयत्न करु नये."

"आयुष्यात एक क्षण भाळण्याचा ,उरलेले सगळे सांभाळण्याचे."

"सौख्याचा कोणता क्षण चिरंजीव झालाय ?
फक्त आठ्वानिंच्या राज्यात तो अमर. आणि आठवणी कधीच सुखद नसतात.
त्या दुखाच्या असोत वा आनंदाच्या. दुखाच्या असतील तर त्या पाई वाया गेलेला भूतकाल आठवतो, आणि त्या आठवणी सुखाच्या असतील तर ते क्षण गेले, म्हणुन त्रास"

"आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, अपेक्षेचे हुन्द्के, दुक्खाचे कढ आणि आवर घातलेले आवेग - हे ज्याचे त्यालाच माहित असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मलुन् जनाच्या क्षणी असावा या सारखी इच्छा पूरी न होने ह्यासरखा शाप नाही. पण साक्षीदार मिलुन त्याला त्यातली उत्कटता न कलने ह्यासरखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपनाचा शाप बरा.."

"पशू माणसांपेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत कारण ते INSTINCT वर जगतात...
बेदम वजन वाढलंय म्हणून घारीला उडता येत नाही, किंवा एखादा मासा बुडाला असं कधी ऐकलंय का ??"

"कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही.....पण गगन्भरारीच वेड रक्तातच असाव लागत..कारण आकाशाची ओढ दत्त्क घेता येत नाही"

"सर्वात जिवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!"

"प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही.
कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच
पळवाटा मुक्कामाला पोहोचवत नाहीत.
मुक्कामाला पोहोचवतात ते सरळ रस्तेच"

"प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापनाइतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, काहींची नंतर!"


"पारिजातकाचं आयूष्य लाभलं तरी चालेल. पण लयलुट करायची ती सुगंधाचीच !"

"समस्या नावाची वस्तूच अस्तित्वात नसते. एक विशिष्ट परिस्थिती निर्माण होते आणि तारतम्याने वागायचे असते. त्याचप्रमाणे एक माणूस दूसर्‍या माणसाच्या संदर्भात एका ठराविक मर्यादे पर्यंतच विचार करू शकतो किंवा मदत करू शकतो.म्हणून एवढ्यासाठीच कुणालाही बदलण्याच्या खटाटोपात माणसाने पडू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होउ नये."

"वियोग झाल्यावर माणुस का रडतो?
-ते फक्त वियोगाचं दुःख नसतं. जिवंतपणी आपण त्या व्यक्तीवर जे अन्याय केलेले असतात,
त्याला आपल्यापायी जे दुःख भोगावं लागलेलं असतं, त्या जाणिवेचं दुःखही त्यात असतं."

"तंञावर फ़क्त यंञच जिंकता येतात. मनं जिंकण्यासाठी मंञ सापडावा लागतो."

"स्वत:चा पराभव जेव्हा स्वत:जवळ मान्य करावसा वाटत नाही तेव्हा डोळ्यांतुन येणार पाणी पापणीच्या आत जिरवायचं असत."

"माणुस जेवढा जवळचा,तेवढा बाण जास्त जहरी......."

"म्रुत्युवर कोणाला विजय मिळवता येत नाही.त्याचं कारण तो वेळ सा.भाळतो वर्तमान्लाळ जपतो मागच्य पुढच्या क्ष्शणाचं तो देणं लागत नाही."

"सुख कधी मागुन मिळत नाही तर ते दुसर्याल दिल्याने मिळते"

"चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!"

"सावली देऊ शकणार्‍या वट वृक्षान विश्रांतीला आलेल्या पाथस्थाला बाकीची झाड सोडून तुला नेमका मीच सापडलो का? अस विचारायच नसत.............."

"वर्धक्यात दात,नजर,केस,कान एकेक निकामी होत त्याला आमचे काका म्हणतात
नियती तुमच्याकडून दीर्घायुष्य लाभाल्याबद्दल सर्व्हाइवल टॅक्स वसूल करते..................."

"जगात पुरुषार्थ ह्या शब्दाचा अर्थ समजलेले पुरुष फार, म्हणजे फारच मोजके आहेत.
पुरुषार्थ म्हणजेजे रसिकता.
जबरदस्ती नव्हे, शारिरिक ताकद नव्हे, तर मानसिक ताकद.
ज्याला हि मानसिक रसिकता समजली त्यालाच पुरुषार्थ समजला.
असा पुरुष, पुरुष असला तरी कोमल असतो. तो कुणावरही जबरदस्ती करत नाही."

"कोणतही समर्थन मूळ दूःखाची हकालपट्टी करू शकत नाही. वर पट्टी बांधायची , ती जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे, ती ज्याची त्याला ठसठसत असतेच."

आठवणी मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारुळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग एक अशा असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसंच आहे."

"मखमलीचा अंगरखा घातला की पहाणाऱ्याचे डोळे दिपतात. पण तो अंगरखा घालणाऱ्याला आतलं अस्तरच स्पर्श करीत असतं. तशा काही व्यथा."

"आपण ईथून आता सात पवल चालू.आशीर्वाद द्यायला ही आपली नवीन वास्तू आहे. पावालागनिक ती तथास्तु म्हणत राहील. तुझ्या दादांची साधना तुझ्या पाठीशी आहे. मारताना दिलेला बाबांचा आशिर्वाद मलाही सावरील. मी आस्तिक आहे की नास्तिक ह्याचा मी कधी शोध गेतलेला नाही.मी श्रधावन्त मात्र जरूर आहे.सौदर्य,संगीत,सुगंध,साहित्य या सर्वांसाठी मी बेभान होतो.पण माझी जमीन कधी सुटत नाही. मी माणूस आहे ह्याचा मला अभिमान वाटतो.मला परमेश्वर व्हायच नाही.नवर्‍याला देव वगैरे मानणार्‍यांपैकी तू आहेस की नाहीस हे मी परिचय होऊनही विच्रलेले नाही. तशी नसशीलच तर उत्तम, पण असलीच तर ईतकच सांगेन की मला देव मानण्याचा प्रयत्‍न केलास तर तो माझ्यावर अन्याय होईल. मला माणूसच मान म्हणजे कळत-नकळत होणारे अपराध क्ष्यम्य ठरतील. कुणाचही मन न दुखावण हिच मी देवपूजा मानतो. जीवात-जीव आसेतो मी तुला सांभाळीन सांभाळीन हा शब्द चुकीचा आहे. त्यात अहंकार डोकावतो. तेव्हा ईतकच सांगेन की आपल्या घरात,संसारात तु चिंतेत असताना मी मजेत आहे अस कधी घडणार नाही. आणि शेवटच सांगायाच म्हणजे मला पत्त्नि हवीच होती,मात्र पत्त्नि झाल्यावर तुझ्यातली प्रेयसी सांभाळ.
मला सखी हवी आहे ..........होशील !!!.........."


"प्रत्येक वेळेला रडणार्याच सान्तवन करता येतच अस नाही, अर्थात रडणार्याला त्याची जाणीव नसते.
केव्हाही डोळे कोरडे करायला आपली आवडती व्यक्ती जवळ यावी अस तिला वाटत.
पण काही वेळेला रडणार्या माणसापेक्षा सान्तव्न करणार्‍या माणसावरच जास्त ताण पडतो.
ज्योतीपेक्षा समई जास्त तापात नाही का?"

"मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात.
तुट्ले तर श्वासानेही तुट्तील, नाहीतर वज्राघातानेही तुटनार नाहीत."

"कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं
कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे.....
म्हणूनच खडक झिजतात
प्रहाव रुंदावत जातो."

"ओळखी केल्याने सौख्याइतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते , शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फ़रक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की " आता हा असा का वागला ?"

"व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'."

There is no single example of Happy Philosopher. So Dont be philosopher.

"रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे.मोकळेपणी रडायला धैर्य लागतं."

कन्या पतीच्या घरी निघाली तेव्हा व. पु. काळे लिहीतातः

"तु पतीच्या घरी निघालीस! होय जायलाच हवं. 'पिता' आणि 'पती' एक रेघ आणि एक वेलांटि इकडची तिकडं, तरीही वाटतं, पती होणर्‍या प्रत्येक पुरुषाला पिता होणं जमेल का? कन्यादान करतांना प्रत्येक पिता मुकं का होत असावा? कदचित तो जवायाला सांगु शकतं नसेल की, बाबा रे , मझ्या मुलीचा तु पतीच आहेस, तरीही संसारात तिचा पित्यासारखा साभाळ करशील का?"

"जगातील कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही. परमेश्वरानं सोनं निर्माण केलं. चाफ़्याची फ़ुलं सुद्धा त्यानंच निर्माण केली. मग त्याला सोन्याला चाफ़्याचा वास नसता का देता आला ? अपुर्णतेतही काही मजा आहेच की.."

"काही स्पर्ष शेवटच्या श्वासापर्यत साथ करतात."

"प्रेम निर्माण व्हायला सहवासाची मदत लागते;जितका सहवास जास्त तितके प्रेम जास्त.
आकर्षणाला एक सेकंदाचा सहवास पुरतो.म्हणुन्च आकर्षणाला अस्तित्व काही सेकंदापुरतचं असत."

"निसर्गाचा,सौंदर्याचा,मोठेपणाचा कशाचाही हा साक्षात्कार झाला की हात जुळतात."

3 comments:

Aparna said...

यातील काही परिच्छेद वाचल्याचे आठवतायत. व.पुं.ची वाक्य विचार करायला लावतात मात्र!

Rahul said...

Va Pu is too good !! त्यांचे प्रत्येक वाक्य फार खोल विचार करायला भाग करते...

HAREKRISHNAJI said...

वाचन का बरे थांबले ?