Thursday, June 18, 2009

चौघीजणी - शांता शेळके

लुईसा अल्कॉट यांच्या 'लिटल वूमेन' आणि 'गुड वाइफस्' या पुस्तकांचा शांता शेळके यांनी केलेला हा अनुवाद.

'मार्च' कुटुंबीयांची ही कहाणी आहे.
मिस्टर-मिसेस मार्च आणि त्यांच्या चार मुली - मेग,जोसेफाईन(ज्यो),बेथ आणि ऍमी या कुटुंबाभोवती फिरणारी ही कथा. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची काही गुणवैशिष्ट्ये असतात. आणि ती प्रत्येक व्यक्ती तिच्या गुणदोषांसकट कुटुंबाने स्वीकारलेली असते. 'मार्च' कुटुंबीयही याला अपवाद नाहीत.
छोट्या-छोट्या गोष्टी मग त्या आनंदाच्या असोत वा दुःख देणारया, त्या सगळ्यांना बरोबरीने सामोरे जाणारे हे कुटुंब. आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडावेत म्हणून धडपडणारया मिसेस मार्च, कुटुंबाला आपापल्या परीने आर्थिक/नैतिक हातभार लागावा म्हणून प्रयत्न करणारया या मुली.

लेखिकेने सर्वच व्यक्तिरेखा खूप प्रभाविपणे उभ्या केल्या आहेत. या मुलींचे बालपण, वाढत्या वयाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधे होत जाणारे बदल हे सगळ अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून अतिशय सुंदररितीने मांडले आहेत. प्रसंग अगदी साधे सोपे असले तरी आपल्यालाही बरच काही शिकवून जातात. व्यक्तिगत भावनांचे पदर खूप सुंदररितीने उलगडले आहेत त्यामुळे वाचताना हे चित्रण अधिक रंगतदार होत जाते. आणि आपणही अगदी नकळत या पात्रांमधे मिसळून त्यांच्यातलाच एक भाग बनून जातो.

एक प्रसंग मला आवडलेला - जेव्हा मेग जॉनच्या प्रेमात पडते तेव्हा ही गोष्ट सर्वात आधी लॉरीला समजते. तो मेगची खेचण्याच्या हेतूने जेव्हा त्यांच्या घरच्या बगिच्यामधे येतो त्यावेळचा हा प्रसंग. लॉरी हा शेजारी रहाणारा या चौघींचा मित्र आणि जॉन हा लॉरीचा शिक्षक असतो.

'मेग त्यावेळी घराच्या खिडकीजवळ उभी असते. तिला पाहून लॉरी गुडघ्यावर खाली बसतो आणि तिच्याकडे हात करून जणू काही तो तिला मागणी घालत असल्याचा(प्रपोज करत असल्याचा) भाव आणतो. मग निराश होऊन उभा रहातो आणि खिशातला रुमाल काढून डोळ्यांना लावतो, त्यानंतर तो रुमाल पिळल्यासारखा करुन मग भेलकांडत-चालत तिथून निघून जातो.' :)

ज्यांनी वाचल नसेल त्यांनी जरुर वाचा हे पुस्तक.

2 comments:

Poonam said...

Hey Aparna,
chan lihila aahes :)

mala pan yach pustakabaddal lihaycha hota as it is one of my all time favs. :)

neways aavadla :)

आशा KD said...

hi ...

khup can pustak ahe he ...