Friday, March 30, 2012

थेंबातलं आभाळ

प्रविण दवणे यांच 'थेंबातलं आभाळ' हे पुस्तक वाचनात आल.
प्रविण दवणे यांनी सकाळ पेपरसाठी लिहिलेल्या लेखांचे संग्रहण या पुस्तकामधे केले आहे.
हे लेख म्हणजे दैनंदिन आयुष्यामधे अनुभवलेले प्रसंग. काही हलके-फुलके, विनोदी तर काही अगदी मनाला भिडणारे, विचार करायला लावणारे!
वाचता-वाचता जाणवते की आपल्यालाही असे अनुभव येत रहातात पण कदचित आपण तितक्या संवेदनक्षमतेने त्यांच्याकडे पहात नाही.
हे पुस्तक वाचताना आपण काही मोठ तत्वज्ञान वाचतोय किंवा हे वाचल्याने मनावर ताण आलाय असं वाटत नाही. पण तरीहि या लेखांमधून लेखकाला जे सांगायचय ते नेमकेपणानं उमगतं.
पुस्तकाच्या शेवटच्या पानावरच्या या ओळी विशेष लक्षात रहातात -

" स्पर्धेच्या धावपळीत तणावाचं ओझं
नव्या जगाचं सूत्र एकच -
मी - माझ्यापुरता - माझं..
अशावेळी कळत नाही - जगावं कसं?
आनंदाचा मेकअप् करीत,
हसावं तरी कसं?
अशा रितेपणात कुणी, ह्रदय भरुन येतं...
मोगरयाच्या कळ्यांनी, ओंजळ भरुन जातं!
हात त्याचे हाती घेता,
जगण कळून जातं...
थेंबामधलं आभाळ मग..
हळूच उजळून येतं!"

No comments: