Friday, July 24, 2009

व.पु.काळे

व.पु. काळेंच्या पुस्तकामधील काही ओळी... खरं तर पुस्तक वाचताना, आशयाच्या अनुषंगाने येणारया या ओळी अधिक प्रभावी वाटतात.

* प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावानुसार वागत असली तरीसुद्धा त्या वागण्याचा एक अपराधी भाव मनात रेंगाळत असतो. अशा विचारांना एखाद्या प्रतिभावंताचा आविष्कार लाभला तर लग्न झालेल्या मुलीला पहिले तीन-चार दिवस पाठराखीण का हवी असते ते कळतं.

* वरच्या शक्तीला निराकार, निर्गुण म्हणणं यासारखा गुन्हा नाही. आकाश,तारे, पर्वत, नद्या, झरे, पशुपक्षी आणि त्या शक्तीची सर्वश्रेष्ठ कलाकृती म्हणजे चालता-बोलता माणूस. इतक्या सगुण साकारातून तो उतरल्यावर मागे जे उरलं ते निराकार निर्गुण!

* दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. आई, वडील, नवरा, मुलगा, मुलगी, बायको हे सगळे अर्थहीन गोंडस शब्द आहेत. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडुन जातो.

* कोणी चांगल म्हटल्यामुळे मी चांगला ठरत नाही किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे मी वाईट ठरत नाही. आपण कसे आहोत हे ज्याच त्याला पक्क माहीत असलं म्हणजे माणूस निर्भय होतो. त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला व्हावी लागते.

* दुसरयाची नजर उधार घेऊ नका.स्वतःच्या नजरेतील ताकद ओळखा, त्याचप्रमाणे आपली मतं घाईघाईने मांडायची चूक करू नका अनुभवातून बोला, प्रचिती घ्या. कोणताही अनुभव आपल्या प्रचितीचा हिस्सा झाल्यावर जे होत त्यालाच ज्ञान म्हणतात.

* प्रेम करण्यासाठी आयुष्य हा एक अवतार आहे. आणि प्रेम म्हणजे ज्या व्यक्तीच्या डोळ्यात स्वतःच बिंब पहायला मिळेल अशी व्यक्ती मिळवण आणि त्यासाठी स्वतःच्या डोळ्यांच्या काचा स्वच्छ ठेवणं. डोळे म्हणजे अंतःकरण. डोळे म्हणजे त्या विशाल अंतःकरणाच्या खिडक्या समज. कुणीही त्या झरोक्यातून डोकावून पहावं, त्याला तिथ अवकाश दिसाव. आपल्यालाही इथे जागा आहे हे त्याला कळावं. या दृष्टीकोनातून आत बघ.स्वतःला पहा. तुझ आयुष्य तू तुझ्या चौकटीच्या बाहेर पडून जगूच शकणार नाहीस.

* प्रेमाची व्याप्ती प्रचंड आहे. आपलं या जगातल अस्तित्व विनाकारण नाही, हे दुसरयाच्या डोळ्यात पाहिल्यावरच कळत. आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ति उरली नाही की आपलं जगणं संपलं. एखाद्याने अचानक आत्महत्या केली की समजावं, तो निष्प्रेम आयुष्य जगू शकत नाही.

* शास्त्रवचनांचा अगोदर अभ्यास करून कधीच आयुष्य जगायच नसतं. प्रत्यक्ष अनुभवातून गेल्या नंतरच शास्त्रात ती उत्तरं आधीच प्रकट झालेली निदर्शनास येतं. उपनिषदासारखे ग्रंथ हे कसोटीचे दगड आहेत. आपल्या सोन्यात तांब किती आहे हे अनुभवातून गेल्यावर त्या कसोटीवर घासून पाहायचं. प्रचितीचा आनंद प्रत्येकाचा स्वयंभू असतो. त्याच्यात बदल संभवत नाही.

* बोलणारया माणसाला जिथे सुरक्षित वाटत त्याला कुटुंब म्हणतात. मतं पटतील, न पटतील. प्रत्येक माणूस स्वयंभू आहे. त्याच्या परीने तो परीपूर्ण आहे. मतभेद त्यामुळेच होतात.त्याला घाबरायच कारण नाही. म्हणून मुस्कटदाबीच राजकारण मी आयुष्यात कधी खेळलो नाही.

4 comments:

shashi... said...

"don garjanchi spardha mhanje ayushya....aai vadil...." - do you agree with that?

Aparna said...
This comment has been removed by the author.
Aparna said...

One more thing, I have added this sentence because it really made me to think over it. How can anyone come to such a conclusion? whether he/she have passed through any such situation to conclude life like this?
Thought to share it with everyone and added here.

shashi... said...

absolutely, I agree that it is worth mentioning, but just wanted to understand why actually the author thinks so...if it is specific to character and not in general then its okay...but otherwise...makes me think...